हृदय तोड दे !
चित्रपट - पुरब और पश्चिम
गीत - इंदिवर
संगीत - कल्याणजी आनंदजी
गायक - मुकेश
कदाचित कुणी तुज दगा जर दिला
घराबाहेरील जर रस्ता दाविला
तेव्हा तू प्रिये यावे माझेकडे
न संकोचता तू मनाशी जरा, ही
विनंती गडे .... ॥धृ०॥
तुला आज माझी गरज ना मुळी
हजारो जीवांचे तुला साकडे
तुझे आज तारुण्य ऐसे जसे
की प्रेमवीरांचा गराडा पडे
हसतील तुला हे जेव्हा आरसे
न भाळेल रुपावर कुणी फ़ारसे
तेव्हा तू प्रिये यावे माझेकडे
जरा ठेव विश्वास मजवर तुला ही
विनंती गडे .... ॥१॥
म्हणू प्रेम याला की व्यवहार हा?
करतेस तू जे तुला आवडे
तुडवून पायी तू मम भावना
कसली नशा ही तुला गं चढे
उतरेल जेव्हा तुझी ही नशा
अंधारतील या दहाही दिशा
तेव्हा तू प्रिये यावे माझेकडे
उघडीच असतील अभय ही कवाडे
सदाही गडे .... ॥२॥
कवी: गंगाधर मुटे
अश्रू!
येतो दाटून गळा, अश्रू होतात गोळा
आले आभाळच भरुनिया काहीच न कळे
नको ओघळाया, पापण्यांना हळूच पुसतो,
मला मात देत ओघळून होती मोकळे
अश्रू असेच असती, किती लपवावे तरी
ओघळती हलकेच, मन होते मोकळे
कवी: आल्हाद पाटील
कवी: आल्हाद पाटील
सांजवेळी साथीला सूर देउन जा ना...!
सांजवेळी साथीला सूर देऊन जा ना
रंग मावळतीचे जरा उधळून जा ना
तो सूर्य विझत चालला नभात एकटाच
भाळी आभाळाच्या चंद्रकोर रेखून जा ना
छे, कशास चर्चा त्या चतकोर आभाळाची
या घराच्या आठवणी उजळवून जा ना
चेहरे लेऊन येतील खोटी स्मिते अनेक
लक्ष्मणरेषा अंगणी जरा आखून जा ना
चांदण्यात वाचेन मी निरोप बोलके तुझे
इथल्या वार्यास तुझा गंध देऊन जा ना
पाऊले घेऊन चालली परक्या देशी तुज
मेघतुडुंब नैनात चैत्रमास फुलवून जा ना
कवयित्री: नयना वानखेडे
रंग मावळतीचे जरा उधळून जा ना
तो सूर्य विझत चालला नभात एकटाच
भाळी आभाळाच्या चंद्रकोर रेखून जा ना
छे, कशास चर्चा त्या चतकोर आभाळाची
या घराच्या आठवणी उजळवून जा ना
चेहरे लेऊन येतील खोटी स्मिते अनेक
लक्ष्मणरेषा अंगणी जरा आखून जा ना
चांदण्यात वाचेन मी निरोप बोलके तुझे
इथल्या वार्यास तुझा गंध देऊन जा ना
पाऊले घेऊन चालली परक्या देशी तुज
मेघतुडुंब नैनात चैत्रमास फुलवून जा ना
कवयित्री: नयना वानखेडे
जेथे विठूच्या नामाचा हो गजर !
जेथे विठूच्या नामाचा हो गजर
माझ्या विठूचे तेथे पंढरपूर || धृ ||
... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
डोळ्यासमोर उभा सावळा श्रीहरी
टाळ चिपळ्यांचा नाद जयजय हरी
जेथे विठूच्या विटेवरी नजर ||१||..माझ्या विठूचे -
... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
रंगे कीर्तन घेऊन वीणा करी
संगे नर्तन तल्लीन झाल्यावरी
जेथे नेमाने वारकरी हजर ||२||..माझ्या विठूचे -
... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
बुक्का गुलाल शोभे ललाटावरी
तुळशीमाळ रुळते कंठावरी
जेथे आधार माउलीचा पदर ||३||..माझ्या विठूचे -
... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
कवी: विजयकुमार देशपांडे

अक्षर गणेश!
एकदा ऑफिसमधल्या माझ्या एका मैत्रिणीने माझ्यासाठी 'अक्षर गणेश' भेट आणलेले. त्यात माझं आणि माझ्या बायकोचं नाव वापरून गणेश चित्र काढले होते. कॅलिग्राफी तर तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल. त्याचाच प्रकार म्हणजे अक्षरातून किंवा शब्दातून एखादी आकृती काढणे. इथे अक्षरातून गणेश चित्र साकारलेले म्हणून त्याला मी 'अक्षर गणेश' म्हणालो. तसं अक्षरांमध्ये कलाकृती रेखाटणे नवे नव्हते मला. पण जेव्हा मैत्रिणीने सांगितले की ती व्यक्ती तुम्ही सांगितलेल्या नावातून अवघ्या २०-३० सेकंदात गणेश चित्र रेखाटते, मला ते विशेष वाटले. म्हटले या व्यक्तीला आपण एकदा भेटावंच. तिच्याकडूनच ती व्यक्ती कुठे असते त्याबद्दल माहिती घेतली आणि ठरवले की एखाद्या दिवशी चक्कर मारावी.
नंतर कालांतराने ती गोष्ट मी विसरूनच गेलेलो. पण एके दिवशी इंटरनेटवर काही शोधताना पुन्हा एकदा त्या व्यक्ती बद्दल एक दोन ओळी वाचण्यात आल्या, त्यात त्यांचं नाव आणि मोबाईल नंबरही होता. तडक फोन केला आणि विचारले की मला तुम्हाला भेटायचे आहे तर कुठे आणि केव्हा भेटू शकतो. मला अनपेक्षित असा आपुलकीपूर्ण प्रतिसाद मिळाला. त्यांनी स्वतःच भेटायला यायचे आश्वासन दिले आणि वेळही मला अनुकूल होईल अशीच ठरवली. मनात आले की माणूस खरंच कमालीचा मवाळ आणि आपुलकीने वागणारा आहे.
त्यांचं नाव आनंद टेके. सारस बागेत मेन गेटजवळच्या जिन्याच्या शेवटी बसलेले असतात. उन्हाळा असो की पावसाळा, गेली ३-४ वर्षे ते नेटाने तिथे येतात. प्रथम गणेश दर्शन घेऊन आपल्या जागी येऊन बसतात, आणि वेळही ठरलेली सकाळी १० ते संध्याकाळी ७, संकष्टीच्या दिवशी सकाळी ५.३०ला. हाती असलेल्या या कलेचा वापर पोटा-पाण्यासाठी करतात पण त्यातही त्यांची गणेश भक्ती आहे. रोज किती तरी अक्षर गणेश रेखाटतो आणि त्याला चित्र स्वरूपात का होईना जास्वंद वाहतो, त्यातच सगळं येतं मला असं त्यांचं म्हणणं. त्यांची इथे मुलाखत वजा गप्पा मांडण्याचा एकच उद्देश म्हणजे त्यांची कला इतर लोकांपर्यंत पोचावी.
नावावरून मला वाटलेले की ३० एक वर्षाची, मध्यम बांध्याची व्यक्ती असेल. पण जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा हा विचार फोल ठरला. एक ३५-४० वर्षाची धिप्पाड बांध्याची असामी म्हणजे आनंद टेके असेल असा विचारही मनाला शिवला नव्हता. तर ठरल्याप्रमाणे आनंद माझ्या घरी आले. आधी सांगितल्याप्रमाणे आनंदजी खरंच कमालीचे मवाळ आणि आपुलकीने वागणारे निघाले. आल्या आल्या त्यांनी फोनवर खोटा पत्ता सांगितल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. नाष्टा करत करत मुलाखत वजा गप्पा रंगल्या. त्यातल्याच काही गोष्टी इथे प्रश्नोत्तर स्वरूपात मांडतोय.
मी: तुमच्या कलेच्या आधी तुमच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल.
आनंदजी: माझ्याबद्दल काय सांगणार ? मी आनंद जगन्नाथ टेके. राहणार सांगवी, तसा मी मूळचा सोलापूरचा (हा निव्वळ योगायोग आहे!). शिक्षण म्हणाल तर १०वी सुद्धा पूर्णं शिकलो नाही. घरी दोघे भाऊ आणि तीन बहिणी. शाळा सोडल्यावर थोडे दिवस वडिलांसोबत किराणा दुकान चालवले. लग्नानंतर पोटा-पाण्यासाठी नोकरीच्या शोधात जे पुण्यात आलो ते आजवर पुण्यातच आहे. मी, माझी बायको आणि आमचा एकुलता एक मुलगा असं छोटंसं कुटुंब आहे. माझे आई-वडील आणि भावंडं सोलापुरला असतात. मुलगा या वर्षी १०वीला आहे आणि गणेश कृपेनं सगळं व्यवस्थित चाललं आहे.
मी: तुम्ही व्यवसाय काय करता? म्हणजे 'अक्षर गणेश' व्यतिरिक्त काही?
आनंदजी: सध्याला 'अक्षर गणेश'वरच पोट-पाणी आहे आणि त्यातच मी आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या समाधानी आहे. तसं मी पुण्यात आलो तेव्हा, म्हणजे जवळ जवळ १९९६ पासून २००१ पर्यंत सिक्युरिटी सुपरव्हायजर म्हणून काम केलं. माझी शरीरयष्टी पाहून मला ते काम मिळालेलं. पण त्या कामात समाधानी नव्हतो म्हणून सांगवीतच घराजवळ छोटसंच दुकान थाटलं. वर्षभरात दुकानाला चांगली भरभराट मिळाली. पण घर मालकाच्या त्रासामुळे दुकान बंद करावं लागलं. उरलेला माल रस्त्यावर विकत असतानाच डॉ. कोडबागे यांच्याशी गाठ पडली. माझ्या देहयष्टीकडे पाहून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुपरव्हायजरची नोकरी दिली. पुढे २००८मध्ये हॅप्पी थॉट्स मध्ये स्टॉककीपर म्हणून लागलो. असा प्रवास करत करत २००८ मध्ये 'अक्षर गणेश' कडे वळलो आणि आजही तिथेच आहे, ते ही समाधानी .
मी: एवढ्या सगळ्या व्यापातून तुम्ही 'अक्षर गणेश'कडे कसे काय वळलात?
आनंदजी: त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे माझी गणपतीवरची श्रद्धा. माझे आई-वडील सांगत की मला लहानपणापासून गणपतीबद्दल विशेष आवड होती. लहानपणी मी गणपतीसारखे दिसणारे दगड गोळा करायचो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यंगचित्र काढण्याचा छंद. त्या छंदामुळे मी कॅलिग्राफी करायला लागलो. वेगवेगळ्या नट नट्यांचे, व्यक्तींचे व्यंग चित्र काढायचो. मी काही राजकारणी आणि काही अभिनेत्यांना त्यांचे व्यंगचित्र काढून त्यांना पाठवलेत. त्यापैकी डॉ. अब्दुल कलामजी, अमिताभ बच्चन, राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सह्या केलेले अभिनंदनपर शुभेच्छा पत्र आले आहेत, जे मी आजही जपून ठेवलेत.
जेव्हा मी सिक्युरिटी सुपरव्हायजर म्हणून काम करायचो तेव्हा फावल्या वेळात पेपर मधले शब्द कोडे सोडवायचो. त्यातून अक्षरांसोबत खेळायला लागलो, अक्षरांपासून वेगवेगळ्या आकृत्या काढायचो. हॉस्पिटलमध्ये जेव्हा कामाला होतो तेव्हा सणासुदीला हॉस्पिटलच्या प्रांगणात रांगोळीने कॅलिग्राफी किंवा अक्षरांतून काहीतरी चित्रकाढणे वगैरे करायचो. २००८च्या दरम्यान राव म्हणून माझे एक जवळचे स्नेही आहेत त्यांच्या मुलीला मी सहज म्हणून तिच्या नावातून गणपतीचे चित्र काढून दिले. तिला ते इतके आवडले की तिने त्यांच्या ओळखीच्या सार्वजनिक आध्यात्मिक कार्यक्रमात नावातून गणपतीचे चित्र काढून द्यायचा स्टॉल लावायचा आग्रह धरला. हो नाही करत मी स्टॉल लावण्यास तयार झालो ते एका अटीवर. अट अशी होती की मी स्टॉलचे उद्घाटन मुख्य महाराजांच्या हस्ते करणार. ठरल्याप्रमाणे स्टॉल लावला, पण कार्यक्रम संपवून महाराज स्टॉल पाहायला येईपर्यंत अर्धा दिवस निघून गेलेला. तो पर्यंत बाकीच्या स्टॉलवर गर्दी जमलेली. महाराज आले तेव्हा त्यांना स्टॉलविषयी माहिती दिली. त्यांनी आश्चर्याने विचारले की माझ्याही नावाचा गणपती काढणार का? असे म्हणून त्यांनी नाव सांगितले. ते महाराज कर्नाटकचे असल्याने नाव जरा अवघड आणि मोठे होते. पण नेहमीप्रमाणे मी त्याही नावाचा गणपती अवघ्या २० सेकंदात काढून पूर्णं केला तेव्हा महाराजांनाही आश्चर्य वाटलेले. त्यावर त्यांनी खूश होऊन मी काय मोबदला देऊ असे विचारले. पण माझ्यासाठी त्यांनी दिलेली शाबासकीच महत्त्वाची होती. पण त्यावर ते म्हणाले की 'फुकट मिळालेल्या गोष्टीला महत्त्व राहत नाही, तुला काहीतरी मोबदला घ्यायलाच हवा. आणि त्यात मीच तुझ्या स्टॉलची बोहनी करणार आहे. मग मी किती पैसे देऊ?' त्यांच्या त्या शब्दाला मान ठेवून मी 'तुम्हाला जे योग्य वाटते ते द्या' एवढंच म्हणालो. महाराजांनी माझ्या हातात दहा रुपयांची नोट ठेवली, जी मी आजही देव्हार्यात ठेवून पुजतो. एवढी वर्षं झाली आजही मी माझं मानधन १० रुपयांपेक्षा जास्त नाही घेत. एखाद्याने आनंदित होऊन जास्ती देऊ केले तरी ती जास्तीची रक्कम मी त्यांना परत करतो. कारण बाप्पाच्या कृपेने माझी परिस्थिती उत्तम आहे, आणि हे काम मी माझ्यासाठी न करता बाप्पाच्या भक्तांसाठी करतो. असंही बाप्पाला मी चित्ररूपी फुलं वाहून पुण्य कमावतोच ना. असंही मी फायद्यातच आहे.
मी: तुमच्या या छंदात म्हणा किंवा नोकरी सोडून तुम्ही पूर्णतः 'अक्षर गणेशा'त गुंतण्याच्या निर्णयाला घरच्यांचा काय प्रतिसाद होता?
आनंदजी: मी पुर्णतः 'अक्षर गणेश' मध्ये गुंतलो ते माझ्या बायकोमुळे. तिचा आधार नसता तर आज हे मानसिक समाधान नसते. जेव्हा स्टॉलला भरभरून प्रतिसाद आला तेव्हा तिनेच 'अक्षर गणेश'ची कल्पना सुचवलेली. सहज ट्रायल म्हणून मी एक दिवस कामावरून सुट्टी घेऊन शनिवार वाड्यावर सुरवात केलेली. पण लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. पण बायकोला वाईट वाटू नये म्हणून प्रतिसाद चांगला मिळाला म्हणून सांगावे लागे. नंतर शनिवार वाड्यावरच एकाने सारसबागेत तळ्यातल्या गणपतीजवळ बसत जा म्हणून सल्ला दिला. त्या प्रमाणे पुढच्या दिवशी बाप्पाच्या आवारात बसलो, आणि खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हटले बाप्पानेच बोलावून घेतले. तेव्हापासून नोकरी सोडून पूर्णं वेळ 'अक्षर गणेश'ला देतोय. यात माझ्या घरच्यांचा, आई-वडिलांचा, भावंडांचा किंवा माझ्या सासू-सासर्यांचा खूप आधार मिळाला. विशेष करून बायकोचे आणि पोराचे, कारण मी असलेली नोकरी सोडून रस्त्यावर असा चित्रं काढत बसतो यात त्यांना कमीपणा जाणवला नाही यासारखं मानसिक धैर्य दुसरं नाही.
तर अश्या या आमच्या गप्पा रंगलेल्या. त्यांच्या आयुष्यातल्या पुस्तकातली बरीचशी पानं त्यांनी माझ्यासमोर उलगडून ठेवलेली. खूपशी वैयक्तिकही होती जी मी इथे ऐकवली नाहीत. पण एकंदरीत एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांच्या खडतर आयुष्यात त्यांनी जपलेला छंदच त्यांच्या जखमांवर फुंकर घालतोय, मानसिक समाधान देतोय.
गप्पा मारत असतानाच आमच्या नावांची त्यांनी साकारलेली काही चित्रे -
१] मल्लिनाथ, तेजस्विनी आणि रुद्राक्ष.

२] विश्वनाथ, पुजा आणि अथर्व.
३] रुद्राक्ष आणि अथर्व.
अक्षरातून अवघ्या २०-३० सेकंदात गणेशचित्र साकारण्याची ही कला नि:स्वार्थ भावनेने लोकांसाठी करणार्या या व्यक्तीला भेटून खरंच खूप आनंद झाला.
लेखक: मल्लिनाथ करकंटी
थरार ... अशेरीगड ट्रेकचा !
किल्ल्याची उंची : १६८० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : पालघर
जिल्हा : ठाणे
श्रेणी : मध्यम
पालघर विभागात जे अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यांच्यात प्रशस्त वाटावा असा हा अशेरीगड. आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो.

इतिहास
: अशेरीगड शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या
गडाचे आयुर्मान साधारणतः ८०० वर्षे आहे असे अनुमान निघते. पुढे १४व्या
शतकात महिकावती नगरी (माहीम) येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून
घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले. पुढे
पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसविल्यावर इ. स. १५५६ साली अशेरीवर हल्ला करून
तो बळकाविला. या किल्ल्याचे महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व
त्यांनी या गडाच्या मजबुतीकरिता अनेक नवीन बांधकामे केली. पुढे संभाजी
राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी इ. स. १६८३ साली
तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले. त्याच वेळी राजांनी अशेरीगड जिंकून
स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७मध्ये हा किल्ला परत
पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी आप्पा पेशवे यांच्या वसई
स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून १७३७च्या कोंकण मोहिमेत हा गड
जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. १८१८
नंतर अशेरीगड इंग्रजांच्या हाती गेला.
ठाणे जिल्ह्यातील पालघर
तालुका आजही गडकोटांनी समृद्ध असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. मुंबई-
ठाणे शहरातील बहुतेक किल्ले आज नामशेष होण्याच्या मार्गावर असताना पालघर
तालुक्यातील गडकोट मात्र लहान लहान डोंगररांगांवर अजूनही आपले अस्तित्व
टिकवून बर्यापैकी अवस्थेत उभे आहेत. मुंबई- अहमदाबाद महामार्गालगत उभा
असणारा "अशेरीगड" हा किल्ला मुद्दाम सवड काढून पाहावा असाच आहे. इतिहास
काळात ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणार्या या किल्ल्याच्या परिसरात साग
वगैरे कित्येक झाडांचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त
ठरणार्या लाकडांमुळे या गडाचे इतिहासकाळात फार महत्त्व होते.
नियो-म्याड आणि क्लिक्स या दोन ग्रुप्स तर्फे रविवार दिनांक १८ डिसेंबर २०११ रोजी "अशेरीगड" ट्रेक आयोजित केला होता. घाटकोपर/ठाणे इथून सकाळी ठीक सात वाजता बसने निघायचे ठरले होते. आम्ही काही जण घाटकोपरला बस मध्ये बसलो .. निघताना तसा थोडासा उशीरच झाला होता. ठाणे इथे आणखी काही जण बसमध्ये बसले. एकूण अकरा जण होतो आम्ही. ठाणे - घोडबंदर दिशेने आमची बस निघाली. काही अंतरावरच बस पोहोचली असेल, अन आम्ही ट्रॅफिक जाममध्ये फसलो.
ठाण्यात त्यादिवशी श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समर्थ संप्रदाय अन शिवसेना यांच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. सर्वच ठिकाणांहून लोक इथे वाहनांनी अथवा पायी चालत त्या दिशेने जात होते. सर्वत्र गर्दीच गर्दी झाली होती. ट्रॅफिकचे अगदी तीन-तेरा वाजले होते. पदयात्री तसेच रस्त्यावरील वाहने मंदगतीने पुढे सरकत होती. पायी चालणार्या लोकांचा वेग काही ठिकाणी वाहनांपेक्षा थोडा अधिकच होता.
हळू
हळू पुढे सरकत आमची बस घोडबंदरच्या दिशेने निघाली. तिथेही दुसर्याच
कारणासाठी ट्रॅफिक जाम झाले होते. गाड्यांच्या लांबच लांब रांगा अगदी
तिथल्या टोल नाक्यापासूनच लागल्या होत्या.
अचानक एका एस्टीच्या ड्राईव्हरने आपली नसलेली
अक्कल-हुशारी दाखविण्याचा प्रयत्न केला. अगदी थोडक्यातच आमची बस वाचली खरी, तरीही आमच्या बसला एस्टीचा मागून निसटता स्पर्श झालाच. एस्टी ड्राईवरला दमात
घेताच माफी मागून त्याने वेळ मारून नेत आपली सुटका करून घेतली. टोलनाका पार
करून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोहोचेपर्यंत साडे-दहा वाजून गेले होते.
आता आमचा प्रवास अहमदाबाद महामार्गाने सुरू झाला. मध्येच बसमध्ये डिझेल
भरून घेतले आणि आम्ही देखील चहा-पाणी उरकून घेतले. इथून पुढे परत एकदा
आम्हाला ट्रॅफिकजामला सामोरे जावे लागले. मस्तान नाक्यावर पोहोचेपर्यंत
आमच्या बस ड्राईवरने बस पुढे काढण्याचे सर्वच प्रयत्न केले . अगदी विरुद्ध
दिशेच्या रस्त्यानेसुद्धा गाड्यांची एक लाइन सुरू झाली विरारच्या दिशेने
जायला. मस्तान नाक्यावरून पुढे चारोटीच्या दिशेने निघालो आम्ही.

मस्तान नाक्यापासून पुढेच १०-१२ कि.मी. डाव्या बाजूला खोडकोना गावाचा फाटा लागतो. या
ठिकाणी महामार्गावर रस्त्याच्या डाव्या हाताला अशेरीगड तर उजव्या हाताला
अडसूळ किल्ला दिसतो. अडसूळ किल्ल्यावर कोणतेच दुर्गावशेष नसल्यामुळे
दुर्गप्रेमींनी या गडाकडे पाठ फिरवली आहे. इथून गाव थोड्या अंतरावरच असून
बैलगाडीच्या रस्त्याने आत जावे लागते. आमची बस छोटीच असल्याने आतपर्यंत
नेता आली. एकदाचे आम्ही आमच्या नियोजित ठिकाणी म्हणजे खोडकोना गावाजवळ
पोहोचलो.
पुढे नदीवरील सिमेंट पुलावरून पलीकडे गेले की आपण गडपायथ्याच्या खोडकोना गावात येऊन पोहोचतो . इथे वेशीवरच वाघदेवाचे छोटेसे परंतु टुमदार मंदिर आहे. आत गेल्यावर विस्तीर्ण पसरलेले आम्रवृक्ष, शेते व त्यातून डोकावणारी घरे प्रवासाचा शीण घालवतात. घरांसमोर स्वच्छ सारवलेले अंगण, मातीचा पोतेरा मारलेल्या भिंती आणि त्यावर वारली चित्रे चितारलेली. अतिशय लोभसवाणी अशी ही चित्रे खोडकोना गावातील प्रत्येक झापाच्या भिंतीवर पाहायला मिळतात. आपण या वारली चित्रकलेचा रसिक मनाने आस्वाद घ्यायचा. सभोवार भाताची छोटी- छोटी खाचरे आणि यात बागडणारी वारली लोकांची स्वच्छंदी, उघडी-नागडी मुले !

इथे
येईपर्यंत रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन गावातून गडाकडे
जाणार्या पायवाटेने निघालो. उजव्या हातास गड व डाव्या हातास गडाकडे घेऊन
जाणारी खिंड असा हा प्रवास आहे. जागोजागी बाणांच्या खुणा पायवाटेच्या
मार्गाची दिशा दाखवून देतात. या खिंडीचा सपाट माथा गाठण्याच्या दृष्टीने
चालायला लागलो.
साग, ऐन, हिरडा, चिंच, पळस, खैर अशा दमदार वृक्षांनी दाटी केलेल्या जंगलामधील मळलेल्या पायवाटेने साधारण तासाभराची चढाई केल्यावर खिंडीच्या माथ्यावर असलेल्या थोड्या सपाटीवर येऊन पोहोचलो. येथून पायवाट उजव्या हातास गडाच्या डोंगरास भिडते. उजव्या हातास झाडीत वाघ्या देवाची मूर्ती दिसते. ही मूर्ती म्हणजे आदिवासींचा जंगलरक्षक वाघदेव.
पुढे
कातळातच खोदलेल्या छोट्या पायर्यांनी आणखी थोडी चढाई केल्यावर सपाटीवर येऊन
पोहोचलो. इथे पूर्वी गडाचा दरवाजा होता. पण नेहमीप्रमाणे इंग्रजांच्या
अवकृपेने तो तोडल्यामुळे थोडी कसरत करत अन शरीर तोलत अरुंद बेचक्यातून
शिडीमार्गे वर गडमाथ्यावर पोहोचलो.
तिथे एक कोरलेले उठावदार दगडी मुकुट व
त्याच्याखाली पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह दिसले. इथेच कातळात खोदलेले
पाण्याचे टाकेही आहे.
या टाक्याचे थंडगार पाणी चढाईचा थकवा क्षणार्धात घालवते.
पुढे कातळातच खोदलेल्या पायर्यांवरून चढत अशेरीगडाच्या दुसर्या
भग्न दरवाज्यात पोहोचलो. इथल्या अवशेषांवरून भग्न दरवाज्याची मूळ रचना
लक्षात येते. अशेरीगडाचा विस्तार उत्तर- दक्षिण पसरलेला असून याच्या
माथ्यावरील जंगल आजही बर्यापैकी टिकून आहे. या वाटेने जाताना डाव्या हाताला
थोडे खाली खडकात पाच पाण्याची टाकी खोदलेली आहेत. यापैकी एका टाक्याचे
पाणी पिण्यायोग्य आहे. पुन्हा सरळ वाटेने पुढे चालल्यावर ५ मिनिटांच्या
अंतराने डावीकडे अजून एक वाट फुटते. तिथून खाली गेल्यावर पाण्याची तीन आणखी
टाकी आहेत.
साग, ऐन, हिरडा, चिंच, पळस, खैर अशा दमदार वृक्षांनी दाटी केलेल्या जंगलामधील मळलेल्या पायवाटेने साधारण तासाभराची चढाई केल्यावर खिंडीच्या माथ्यावर असलेल्या थोड्या सपाटीवर येऊन पोहोचलो. येथून पायवाट उजव्या हातास गडाच्या डोंगरास भिडते. उजव्या हातास झाडीत वाघ्या देवाची मूर्ती दिसते. ही मूर्ती म्हणजे आदिवासींचा जंगलरक्षक वाघदेव.
पुढे
कातळातच खोदलेल्या छोट्या पायर्यांनी आणखी थोडी चढाई केल्यावर सपाटीवर येऊन
पोहोचलो. इथे पूर्वी गडाचा दरवाजा होता. पण नेहमीप्रमाणे इंग्रजांच्या
अवकृपेने तो तोडल्यामुळे थोडी कसरत करत अन शरीर तोलत अरुंद बेचक्यातून
शिडीमार्गे वर गडमाथ्यावर पोहोचलो.
तिथे एक कोरलेले उठावदार दगडी मुकुट व
त्याच्याखाली पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह दिसले. इथेच कातळात खोदलेले
पाण्याचे टाकेही आहे.या टाक्याचे थंडगार पाणी चढाईचा थकवा क्षणार्धात घालवते.
पुढे कातळातच खोदलेल्या पायर्यांवरून चढत अशेरीगडाच्या दुसर्या
भग्न दरवाज्यात पोहोचलो. इथल्या अवशेषांवरून भग्न दरवाज्याची मूळ रचना
लक्षात येते. अशेरीगडाचा विस्तार उत्तर- दक्षिण पसरलेला असून याच्या
माथ्यावरील जंगल आजही बर्यापैकी टिकून आहे. या वाटेने जाताना डाव्या हाताला
थोडे खाली खडकात पाच पाण्याची टाकी खोदलेली आहेत. यापैकी एका टाक्याचे
पाणी पिण्यायोग्य आहे. पुन्हा सरळ वाटेने पुढे चालल्यावर ५ मिनिटांच्या
अंतराने डावीकडे अजून एक वाट फुटते. तिथून खाली गेल्यावर पाण्याची तीन आणखी
टाकी आहेत.यापुढची पायवाट थोड्या वेळात गडाच्या सर्वोच्च पठारावर घेऊन जाते. येथे पोहोचताच समोरच आपणास पडक्या वाड्याचे चौथरे दिसतात.
विशेष म्हणजे, या चौथर्याच्या चारी बाजूंनी दगडी चर खोदलेला आहे. येथून पुढे आम्ही एका दगडात खोदलेल्या गुहेत येऊन पोहोचलो. या गुहेच्या आतील बाजूस कातळावर अशेरी देवीचा तांदळा असून गुहेत चार-सहा लोक झोपतील एवढी जागा आहे. गावकर्यांकडून येथे कधीतरी पूजा होत असावी असे वाटणारी व एरवी सहसा न आढळणारी दोन जास्वंदीची झाडे गुहेच्या तोंडासमोरच आहेत. गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळे आहे. या तळ्यात एक अर्धवट बुडलेली तोफही आहे असे समजले. याशिवाय आणखी दोन अर्धवट बांधलेली तळी आहेत. पुढे गडाच्या माथ्यावर कमलपुष्पांनी भरून गेलेला तलाव दिसला. सह्याद्रीतील किल्ल्यांवर शेकडो तलाव आहेत. पण कमलवेलींनी भरून सौंदर्य वाढवलेला हा एकमेव असावा.
गडावर आम्ही अल्पोपहार केला.
सूर्यास्त होईपर्यंत आम्ही गडावरच फेरफटका मारत फिरत होतो. सूर्यास्तानंतर
आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. टॉर्चेस जवळ होत्याच, पण काळोख होण्याच्या
आधीच गडाच्या पायथ्याशी पोहोचायचे ठरले होते. अर्ध्या वाटेतच अंधाराने
आम्हाला गाठले पण तोपर्यंत आम्ही गड उतरलो होतो आणि मग मात्र सावधपणे आम्ही
जंगलवाटेने परतीचा मार्ग चालत - खरे तर अडखळत, ठेचकाळत - गाव गाठले.
गावाबाहेर पडल्यानंतर पुढे बसमध्ये बसलो आणि आमचा परतीचा प्रवास सुरू
झाला.
अॅक्टिव्हिटी!
"आई, उद्या नारळाची करवंटी हवी आहे!" रात्री सुमारे आठाच्या सुमारास एक बॉम्ब पडला.
"अरे! उद्या? आणि हे आत्ता सांगतोयस?" माझा आवाज चढायला तसाही फार वेळ लागत नाही!
"आजच सांगितलं. आम्ही बहुतेक त्याचा तबला करणारोत उद्या. आई, करवंटी म्हणजे काय?" करवंटीचा तबला! हसावं की रडावं कळेना. त्यात हा असा निरागसपणा! "अरे, आपली काय नारळाची बाग आहे की काय, आं? पाहिजे नारळ, तर जा बागेत, आणि आण तोडून! आणि थेट करवंटीच! खोबरं नको का? त्याचंही काहीतरी करा की करंज्याबिरंज्या!"
माझी चिडचिड, माझी अगतिकता, समोर पडलेली कामं आणि त्यात हे आलेलं वाढीव काम! पण बिचार्यापर्यंत काहीच पोचत नव्हतं, कारण करवंटी म्हणजे काय हेच माहीत नसलेल्या मुलाला, करवंटीसाठी काय काय सव्यापसव्य करावं लागतं हे माहीत असणंच शक्य नव्हतं!
"हां आई, त्याला आतून पॉलिश करून स्मूथ करून न्यायची आहे बर्का!"
"हो सर. अजून काही?"
उपरोध समजतो त्याला. "काही नाही. इतकंच."
मुलाला शिशू वर्गात अडकवल्यानंतर साधारणपणे आपल्यावर काय बेतणार आहे ह्याची कल्पना आई-वडिलांना आलेली असते. रडकं मूल, आक्रस्ताळं मूल, लाजरं मूल, अतिउत्साही मूल, डबा न खाणारं मूल- ह्याच्याशी दोन हात करता येतात. इतर अनुभवी पालक, शिक्षक, खुद्द मूल ह्यांच्याशी बोलून काही ना काही मार्ग निघतोच. मग मूल मोठं होतं. शाळेत चांगलंच रमतं आणि सुरू होतात ’अॅक्टिव्हिटीज’! हा म्हणजे शुद्ध छळ असतो पालकांचा! कारण ह्या सुरू होतात प्राथमिक शाळेत. मुलं त्या करण्याइतकी मोठी आणि कुशलही नसतात. त्यामुळे त्या कराव्या लागतात पालकांनाच. आता हा तबला! करणार पाल्यच शाळेत. पण नारळ आणा, फोडा, संपूर्ण खोवून घ्या, आतून ’स्मूथ’ करा आणि त्या गळ्यात पडलेल्या खोबर्याचं काहीतरी करून डायटची वाट लावून घ्या. हे शाळेत ऑर्डर देणार्या शिक्षिकेला समजत नाही. ती फक्त सांगते. आणि आपल्याला ऐकावंच लागतं!
पुढल्या गुरुवारी अजून एक फर्मान.
"आई शनिवारी कचरा न्यायचाय शाळेत."
"कचरा????????"
"म्हणजे, वाळलेली पानं, काड्या, पिसं, जुन्या रिबिनी असं. पक्ष्याचं घरटं करायचं आहे."
पानं, काड्यांपर्यंत ठीक. पण पिसं? रिबिनी? मी माझ्या जन्मात सहा इंचांची लांबी न ओलांडलेल्या केसांकडे एक करुण कटाक्ष टाकला. त्यानंतर ’अनुभव’ वगैरे पणाला लावून वाळकी पानं, कुंच्याच्या काड्या, कापूस, ’त्या’ नारळाची शेंडी वगैरे दिली. त्याने त्या दिवसाचा प्रश्न मिटवला.
मग मक्याच्या कणसाची पानं, एकदा नुसतंच बाटलीभरून चिंचेचं पाणी, अजून दोन वेळा करवंट्या (त्या पहिल्या करवंटीचा बाहेरून तबला, दुसरीवर बाहेरून ’वारली पेन्टिंग आणि तिसरीचा आतून पेन स्टॅन्ड झाला!), सहा प्रकारची झाडांची पानं आणि असेच अनेक शेकडो प्रकार झाले! त्यानंतर अशा एका झाडाची पानं आणायची होती, ज्याची पानं वापरून एक प्राणी करता येईल! (कशासाठी? त्याने कोणतं कौशल्य आत्मसात होतं? शहरात आधी झाडं कमी, त्यात अशी झाडं हवीत ज्यांची पानं नुसती पानं असून चालत नाहीत, तर वेळप्रसंगी त्यांचे प्राणी आणि पक्षीही व्हायला हवेत- अशी किती झाडं मिळणार? पण हे सगळे प्रश्न मनातच. मुलाच्या मनात शाळेबद्दल काही भलतंसलतं नको भरवायला!) आमच्या इथे जे झाड उपलब्ध आहे, त्याची पानं वापरून मी (माझ्या दृष्टीने) मोराचा आकार तयार केला होता आणि मुलाला कौतुकाने दाखवायला गेले- की उद्या असं चिकटव. तर पाहिल्या पाहिल्या बाळ वदले, "आई, मस्त झालंय शहामृग!" त्यानंतर ’आदिवासी मानवाची अस्त्र-शस्त्र’ ह्यांचा कार्यानुभव हवा, म्हणून आम्हाला चक्क रस्त्यावरच्या झाडांच्या खाली पडलेल्या काटक्या गोळा कराव्या लागल्या- कारण त्या काटक्यांना कागदी पाती चिकटवून ह्यांना भाले करायचे होते!!
मग आली वार्षिक संमेलनाची तयारी. आमच्या मुलाला पार्श्वभूमीवर असलेल्या एका ’झाडा’चा रोल आला! काऽऽऽही करायचं नाही, फक्त उभं राहून डोलायचं. अशी अजून अर्धा डझन झाडं होती. पण साधंसुधं झाड नाही, त्याला ड्रेपरी आणा- असं फर्मान काढलं शाळेनं. बरं. आम्ही फक्त आज्ञापालनासाठी बसलेलो असल्याने, गेलो भाड्याने पोशाख मिळणार्या दुकानात. तिथे फारच भारी ’ड्वायलॉक’ चालले होते.
काउंटरवरच्या दोघी ’शिवाजी आणि मावळे’ ह्यावर चर्चा करत होत्या-
’परवाला 12 मावळे आणि एक शिवाजी हवाय. आहेत का इतके मावळे?’
’मावळे आहेत. पण शिवाजी नाहीये. काय वयोगट आहे? संभाजी आहे, चालेल का विचार.. एकच ड्रेपरी असते, फक्त साइज लहान!’
’जीवन ह्यांना कळले हो’ असा कार्यक्रम असतो ना? त्यांनी नक्कीच इथे येऊन फक्त ह्या संवादांचं रेकॉर्डिंग केलं तरी चाललं असतं. असो. तर झाडाचं सांगत होते.. त्यांच्या भाषेत सांगायचं तर, ’झाड संपलंय. खालचा खोडाचा भाग आहे फक्त. (इथेही वृक्षतोड चालू आहे की काय?) वरचा कटाआऊट तुम्ही कराल का? सोपा असतो अहो!’ आम्हाला आता कोणतीही संकटं लीलया पेलायची सवयच घडवली आहे शाळेने. शिवाय झाड ’उद्या’वर येऊन ठेपलं होतं. ’हो’ म्हणण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं! मग कार्डशीट आणा, हिरवे घोटीव कागद, ’झाडाला’ बळकटी मिळावी म्हणून मध्ये थोडा जाड पुठ्ठा, डोकं बाहेर काढायला जागा असे बरेच सव्यापसव्य करावे लागले! एकदाचं झालं ते झाड उभं आणि स्नेहसंमेलनात डोलूनदेखील आलं! आता वार्षिक ’प्रोजेक्ट’ येईल. ते सर्व आई-वडिलांनीच केलेली असतात हे त्यांच्याकडे पाहूनच कळतं. गेल्या वर्षी सामोस्याच्या आकाराचे डोंगर उभे केले होते! यंदा काय करायला लागतंय काय माहीत! तरी अजून मी दर शनिवारी होणार्या ’अॅक्टिव्हिटी’च्या सामानाची यादी नाही दिलेली!
एकुणात कार्यानुभव आणि मुलं ह्यांचा परस्परसंबंध काय? शाळा आपण मुलांना काही भरीव शिकवतोय ह्या भ्रमात असते का? अश्याने मुलांना खरंच हस्तकलेची गोडी लागते का? बरं विषयानुरूप जे काही करायचं असेल, ते शाळेतच का नाही करत? त्याचं साहित्य, त्याची कलाकुसर जे करायचं आहे, ते शाळेतच पुरवा ना. किंवा पालकांना पुरेसा अवधी तरी त्या तयारीसाठी. अशी एका रात्रीत मक्याच्या कणसांची (नुसतीच) पानं, काटक्या, करवंट्या कुठून पैदा करायच्या? बरं, जे घरून करून आणायचं असतं, त्याला कौशल्याची एक ठराविक पातळी लागते. ती ह्या वयात नसतेच. सांडलवंड, वाया घालवणे हे मुलांचे जन्मजात गुण आहेत. ’कापसाचे फुलपाखरू’ करताना चिकटवलेल्या कापसाच्या किती पट कापूस हवेत उडाला ते आम्हाला विचारा! जन्मजात टेन्डन्सीला शिस्त लावून ह्या वयाची मुलं सुबक सुंदर काही जन्माला घालतील हे शक्यच नाही. तरी, तरी कमीअधिक हे मुलांच्या बोकांडी प्रत्येक शाळा बसवतेच! (मुलांच्या म्हणजे पालकांच्या.) कशासाठी?
कदाचित हा एक अव्यक्त सूड असावा का? तुमच्या मुलाला पाच तास सांभाळल्याबद्दल, त्याला शिस्त लावल्याबद्दल, त्याला ’शहाणं’ करून सोडल्याबद्दल ही एक जास्तीची फी मागत असेल का शाळा? का, पालकांना ह्या वयात त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा उदात्त हेतू असावा? हे कारण असू शकेल. उद्याच्या उद्या ’कडधान्यापासून केलेले पाच प्राणी’ द्यायचे असतात ना, तेव्हा खरं सांगते, संसारातले कोणतेच गहन आणि गंभीर प्रश्न त्या दोन तासात सतावत नाहीत.. कल्पनाशक्तीला धुमारे फुटतात.. एखाद्या कलाकृतीला जन्म देण्यापूर्वीची अस्वस्थता, हुरहूर वगैरे जाणवायला लागते, पंचवीस वर्षापूर्वीच्या ’कार्यानुभव’च्या तासाला आपण काय माती खाल्ली होती ते आठवून मनात ईर्ष्या जागृत होते आणि संपूर्ण एकाग्रता साधत मन कसं त्या ’अॅक्टिव्हिटीत’ गुंतून जातं!
लेखिका: पूनम छत्रे

फक्त !
’फक्त’ शब्दाची मजा सांगते मी इथे,
जास्त नाही, फक्त काहि, शब्द लिहिते इथे ll १ ll
सांगतो, एकमेका, फक्त आराम कर,
नशिबी असे परी, फक्त तू काम कर ll २ ll
फक्त चहा, फक्त नाश्ता, फक्त स्वयंपाक कर,
फक्त मुलांचा अभ्यास घे, अन फक्त, नोकरी कर ll ३ ll
फक्त स्वच्छता कर, अन फक्त बाजारहाट कर,
फक्त बिले तू भर, अन, फक्त आराम कर ll ४ ll
मुलांना सांगतो आम्ही, फक्त अभ्यास कर,
फक्त स्कॉलरशीप, अन फक्त स्पर्धा कर ll ५ ll
फक्त क्लास, फक्त गाणे, फक्त व्यायाम कर,
फक्त नाच, फक्त प्रत्येक कला, आत्मसात कर ll ६ ll
फक्त शब्दाने किती केली जादू ही अशी,
फक्त शब्दाने लहान वाटती लाखोंच्या राशी ll ७ ll
म्हणून तुम्हीही सदा ’फक्त’ ठेवा लक्षात,
फक्त, फक्त, असे नेहमी घोका मनात. ll ८ ll
कवयित्री: सुलभा मुंडले

सफेद वाटाण्याची उसळ!
साहित्य: सफेद वाटाणे, २ कांदे, १ चमचा सुके खोबरे, टोमाटो, आले, लसूण,
हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढी पत्ता, मोहरी, जिरे, हिंग, तेल, तिखट,
गरम मसाला, हळद अन मीठ.
कृती: वाटाणे ७-८ तास भिजवून ठेवा. भिजवलेले वाटाणे कुकरमध्ये शिजवून घ्या. १ कांदा गॅसवर अक्खाच भाजून घ्या. भाजलेल्या कांद्याची वरची साले काढून घ्या. सुके खोबरे भाजून घ्या. भाजलेले खोबरे अन कांदा मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करा. आले-लसूण-हिरव्या मिरच्या-कोथिंबीर बारीक चिरून घ्या. टोमाटो ही चिरून ठेवा. १ कांदा उभा चिरून घ्या.
फोडणीसाठी तेल गरम करा. मोहरी अन जिरे फोडणीस घाला. मोहरी तडतडली कि लसूण पाकळ्या ठेचून घाला. हिंग, कढी पत्ता, हिरव्या मिरच्या, आले, लसूण घाला. चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. हळद, तिखट अन गरम मसाला घाला अन परता. टोमाटो घाला अन झाकण ठेवून शिजवा. आता यात शिजवलेले वाटाणे घाला अन चांगले परतून घ्या. झाकण ठेवून शिजू द्या. आवश्यकतेनुसार पाणी घाला. चांगली उकळी आल्यावर अन वाटाणे व्यवस्थित शिजले की मग कांदा-खोबर्याचे वाटण घाला. पुन्हा उकळी देऊन चवीनुसार मीठ घाला. शेवटी बारीक चिरून कोथिंबीर घाला अन उसळ सजवा.

प्रेषक: आल्हाद पाटील

नवी पहाट - नव्या आशा आकांक्षा!
हे दृश्य टिपलेय ... नाशिक जवळच्या नांदूर-मध्यमेश्वर परिसरातील सूर्योदयाच्या वेळी. गारठून टाकणार्या थंडीने पहाटेचे सर्व व्यवहार मंदावले असले तरीही निसर्गाचे चक्र मात्र नेहमीप्रमाणे सुरूच असते. भल्या पहाटे निसर्गाचा आगळा नजारा आपल्याला बघावयास मिळतो. हळूहळू प्रकाश वाढत असतो, आसमंत तेजाने उजळत असते आणि पूर्वेच्या क्षितिजाकडून हलकेच सूर्याचे दर्शन होते. सोनेरी किरणांनी सर्व परिसर झळाळून उठतो आणि आणखी एक नवा दिवस सुरू झालेला असतो ..... !!!
छायाचित्रकार: आल्हाद पाटील
छायाचित्रकार: आल्हाद पाटील
" गाजर हलवा! "
कृती: दूध उकळवून आटवून घ्या. कढईत गाजराचा कीस नुसताच परतून घ्या. चांगले परतून त्यात १ चमचा तूप घाला. व्यवस्थित परतणे आवश्यक आहे. आता यात उकळून आटवलेले दुध घालून परतत रहा. हे सर्व व्यवस्थित शिजत आले की त्यातले पाणी आटत जाईल. आता पुन्हा उरलेले १ चमचा तूप घाला. दाणेदार हलवा तयार झाल्यावर त्यात काजू-बदामाचे काप अन चारोळ्या घालून सजवा.
प्रेषक: आल्हाद पाटील
" मूग डाळीची भजी! "
कृती: मूग डाळ ४-५ तास भिजत ठेवा. निथळून घेतलेली डाळ, आले-लसूण-मिरच्या- कोथिंबीर अन मीठ घालून वाटून घ्या.
कढईत तेल तापत ठेवा. तापलेले १ चमचा तेल वाटणात मिसळा. गरम तेलात भजी व्यवस्थित तळून घ्या. गरमागरम भजी चटणीसोबत वाढा.
प्रेषक: आल्हाद पाटील
महानगर!
मी जिथे राहतो
ते एक महानगर आहे..
इथल्या व्याख्या वेगळ्या आहेत..
इथली परिमाणं वेगळी आहेत..
इथे उंची, ब्रॅंड्समध्ये मोजली जाते
आणि श्रीमंती, स्क्वेअर फूटमध्ये..
खोली लक्षात येते सरकारी कचेर्यात..
आणि झेप, मिळणार्या पॅकेजमध्ये..
इथे व्यक्तीस्वातंत्र्य लक्तरांमध्ये मिरवतं..
कधी फसफसतं आणि मग फुटपाथवर हसतं.
इथल्या रात्री आगळ्या आहेत..
काही अंग थिरकत असतात
आणि काही कुडकुडत असतात..
काही पाय लटपटत असतात..
आणि काही लगबगत असतात..
काही हात शिवशिवत असतात..
आणि काही विनवणत असतात.
इथले दिवससुद्धा गमतीदार आहेत.
सकाळ झाली रे झाली..
की रस्त्यांवर घड्याळे धावतात...
सिग्नलवर थांबलेली घड्याळे..
लाल दिव्याखालच्या आकड्यागणिक
कॅल्कुलेटरमध्ये बदलतात..
एखादा कॅल्कुलेटर घाईघाईत घड्याळ बनतो..
मग एखादे घड्याळ अचानक बंद पडते, कायमचे..
काळ-काम-वेगाचे गणित सोडवतांना..
माणूस कधी वजा केला जातो, कळतंच नाही..
इथे गुलामगिरी आहे..
गगनचुंबी इमारती, मॉल्स आणि झगमगते रस्ते म्हणजे
सावज हेरायला बनवलेला आधुनिक सापळा आहे..
घंटांची किणकिण..
बागेतला चिवचिवाट..
हास्याचा खळखळाट..
म्हणजे मुक्तीसाठी केलेला आक्रोश आहे..
हे महानगर म्हणजे एक मोठे ऑक्टोपस आहे..
जे काही त्याच्या कवेत येईल ते तो गिळतो..
आणि छोट्या ऑक्टोपसांना जन्म देतो..
आणि चक्र चालत राहतं..
कवी: संकेत पारधी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)