" मूग डाळीची भजी! "

साहित्य:  मूग डाळ, अर्धा ईंच आले, २-३ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, तेल, मीठ.
कृती: मूग डाळ ४-५ तास भिजत ठेवा. निथळून घेतलेली डाळ, आले-लसूण-मिरच्या- कोथिंबीर  अन मीठ घालून वाटून घ्या.
कढईत तेल तापत ठेवा. तापलेले १ चमचा तेल वाटणात मिसळा. गरम तेलात भजी व्यवस्थित तळून घ्या. गरमागरम भजी चटणीसोबत वाढा.

   प्रेषक: आल्हाद पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: