मेरा भारत महान (एक मुक्त चिंतन (? )


रफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिलमें है..
सायमन गो बॅक, गो बॅक सायमन...
बडे बडे शहरोंमें ऐसी छोटी छोटी बातें...
एकही थप्पड मारा..................?
पेडर रोड फ्लायओव्हर झालाच पाहिजे...
माय..., कायतरी भाकरतुकडा आसंल तर वाढ गो माय....
We don't support FDI, Trunmul Congress
पश्चिम बंगालसाठी ८, ७५० कोटींचे पॅकेज
आयचा घो...
म्हशीचा पो...
डोक्याचं दही
पण विशल्या तू लिही...
कोणी वाचलं काय, आन नाय वाचलं काय...
पण लिही.........
लिहायला काय लागतं?
डोकं...? अजिबात नाही...
संवेदना?
छे..........., तिचा काय संबंध?
सामाजिक बांधीलकी......?
हुश्श... केवढा अवघड शब्द.........!
सगळा गोंधळ माजलाय नुसता
साला आमच्या बेसिकमध्येच लोचा आहे
लहानपणापासून आई बापाने शिकवलेलं..
शाळेतून रटून घेतलेलं...
भारत माझा देश आहे..
सारे भारतीय माझे बां.....
वर नेहमीचं तुणतुणं...
हम होंगे कामयाब...., हम होंगे कामयाब....
हम होंगे कामयाब... एक दिन.....
हमारी मांगे पुरी करो...
तुम्हारी कुर्सी खाली करो...
उपयोग काय?
खुर्ची रिकामी थोडीच राहणार...
वारसदार येणारच....
औरस असो वा अनौरस....
वंशाला दिवा असणारच?
सशक्त लोकपाल बिल आजची गरज...
नसते विमानप्रवास आणि तथाकथित विश्वासघात...
गांधीबाबाचा विजय असो...
अहिंसेच्या बैलाला होsssssssssssss..........
नवनव्या संकल्पना, बदलते संदर्भ, बदलत्या व्याख्या
शब्दांचे खेळ...
नैतिकतेच्या उलट्या-पालट्या...
बदलणार्‍या निष्ठा...., भेडसावणार्‍या श्रद्धा...
आमचे दादा, तुमचे भाऊ....
सगळा मलिदा वाटून खाऊ...
कोकणचा कॅलिफोर्निया...
मुंबईचे शांघाय...
मुंबै भुमिपुत्रांची, उपर्‍यांची नै रे  भाय...
युपीका आदमी महाराष्ट्रमें भीक मांगने क्यू जाता है...
पुतळा पार्कचा खर्च पाच हजार कोटींच्या वर
दे टाळी..,
नाय तर....
बच्चोssssssss, बजाव ताली
जमुरे...
खेल दिखायेगा?
जी मालिक...
जमुरे, नाच करके दिखायेगा....
जी मालिक...
जमुरे..., पोटाला खाणार काय?
मंत्र्यांची आश्वासने, महागाईचे वाढते दर... दुसरं काय?
च्यामायला.... सगळेच घोळ....
कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही...
हरकत नाय....
निवडणुका आल्या की युवराज आमच्या दारात...
अण्णा म्हणतात, ’आवाज द्या....! ’
'मातोश्री' म्हणतात 'आवाज कुणाचा? '
दादांचं म्हणणं एकच...
खळ्ळ्.. खटॅक....!!
त्यात काय? हे असंच चालायचं.....
काय करायचं? कसं जगायचं? कसं उरायचं?
आम्ही रडायचं, स्वतःशीच कुढायचं...
भुकेच्या नावाखाली भुकेलाच दातांनी चावायचं...
ते म्हणणार...
देश आपला आहे? आपली जबाबदारी आपणच पार पाडणार?
मेरा रंग दे बसंती चोला...
माये रंग दे बसंती चोला...
त्याग हेच आपले कर्तव्य...
देशासाठी जगायचं, देशासाठी मरायचं.... (? )
.......
....
अरे हा sss ड..., हा sss ड...,
साल्या, माझीच तंगडी सापडली का टांग वर करायला...?
साले काहीही म्हणा....
पण डॉन २ मधली PC म्हणते तेच खरं...
कुत्ता अपनी पुंछ सिधी भी करले, रहेगा तो कुत्ताही !
च्यायला आमची नवी ओळख....
इलेक्ट्रिकचा खांब...
कुणीही यावे.. टांग वर करून जावे....
पण ते जाऊद्या,
चला म्हणा रे जोरात....
जिंदगी झाली वैराण, पण मेरा भारत महान!

लेखक: विशाल कुलकर्णी

२ टिप्पण्या:

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

विशाल, अतिशय वास्तववादी ...........भयंकर परिस्थीती आहे ही.

अमित दत्तात्रय गुहागरकर म्हणाले...

भुकेच्या नावाखाली भुकेलाच दातांनी चावायचं... <<

राजनैतीक पोस्टमार्टेम