मध्यंतरी माझ्याकडे सल्ला मसलतीसाठी माझ्या ऑफिसात एक अशील आला असता त्याचा जमाखर्च मी कसा मांडला हे सांगत होतो, काम पूर्ण झाल्यावर तो आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलत होता. तेव्हा चटकन बोलून गेला. “माझ्या धंद्याचा जमाखर्च तुम्ही नेहमी व्यवस्थित जमवता पण आयुष्यातल्या या बाबींचा जमाखर्च मला काही जमवता आला नाही.” त्याच्या भाऊबंदांबरोबर स्थावर मिळकतीच्या दाव्याबाबत तो बोलत होता. चटकन माझ्या डोक्यात कल्पना आली की प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या बाबींचा जमाखर्च असाच मांडायला हवा व शेवटी आयुष्याचा; म्हणजे आपण काय काय कमावले व काय काय गमावले हे नीट स्पष्ट होईल.
आपल्या आयुष्यात वेगवेगळी खाती असतात असे मानले तर ही कल्पना स्पष्ट होईल व जमाखर्च मांडणे सुलभ व सुकर होईल. उदा. आपली नोकरी हे एक खाते मानावे. त्यातून मिळणारा पगार, त्यातून मिळणारे समाधान, तिच्यासाठी लागणारे कष्ट, वरिष्ठांबरोबरचे व सहकार्यांबरोबरचे संबंध या गोष्टी धराव्यात. यात एखादी गोष्ट मनासारखी नसेल तर ती खर्चाच्या बाजूस जाईल व जी मनासारखी असेल ती जमेच्या बाजूस जाईल. नोकरी खात्यावर जमेपेक्षा खर्च कमी असल्यास तो नफा व उलट असल्यास तोटा मानावा व एकूण नोकरी ह्या खात्याचा जमाखर्च पूर्ण करावा.
एखादा धंदेवाईक असेल तर त्याने आपल्या धंद्याचा या रितीने वेगळा जमाखर्च मांडावा. धंद्यात होणारा नफा, त्यातील लाभलेली पत, मिळणारे समाधान, धंद्यातील कामगार, हाताखाली काम करत असणार्या सर्व माणसांशी जोडलेले संबंध, इतर धंदेवाईकांशी जोडलेले संबंध, यांचा जमाखर्च मांडावा. ज्या गोष्टी मनासारख्या नाहीत त्या खर्चाच्या बाजूला जातील व ज्या आहेत त्या जमेच्या बाजूला जातील!
आपण राहायला सोसायटीत फ्लॅट घेतो…बाजारभावापेक्षा कमी / जास्त, लाभलेले शेजारी, बिल्डरचा वेळकाढूपणा, पैसे काढू वृत्ती, सोसायटीतील इतर सभासद, त्यांच्याशी संबंध, सोसायटीच्या कायदेशीर बाबींची पूर्तता (उदा. जमिनीचे हस्तांतरण, नोंदणी इ.), सोसायटीतील भांडणे, त्यातील नैतिक जयापजय इ. गोष्टी या गृहखात्यावर टाकाव्यात. जर खर्चाची रक्कम कमी आली तर आपण कायमस्वरूपी चांगली जागा घेतली व जागा लाभली असे समजावे अन्यथा नाही.
आपल्या कौटुंबिक अथवा खाजगी आयुष्याचा असाच जमाखर्च मांडता येईल. पती-पत्नी मधील संबंध, जोडीदार मनासारखा लाभणे अथवा न लाभणे, विवाहोत्तर काळातील जोडीदाराशी होणारा संघर्ष (यास मतभेद/संघर्ष/वादविवाद असे गोंडस नाव द्यावे, भांडण म्हणू नये! हे नेहमी होतातच! तेव्हा निराश होऊ नका), मुले चांगली अथवा वाईट निपजणे, निर्व्यसनी निपजणे, त्यांच्याशी होणारा संघर्ष(यालाही भांडण न म्हणता ’जनरेशन गॅप’ असेच गोंडस नाव देतात), नवरा व्यसनी असणे / नसणे, त्यास ’नाद’ असणे, पत्नी भांडखोर, विक्षिप्त, खर्चीक असणे, पत्नीचे आपल्या सर्व नातेवाईकांशी असणारे संबंध, तिच्या नातेवाईकांशी असलेले आपले संबंध, तिच्या आईवडीलांचा आपल्या संसारातला हस्तक्षेप(हा बहुदा तापदायक असतो; विशेषत: घरात सासू वरचढ असेल तर!)या सर्व गोष्टींचा एक जमाखर्च मांडावा. येथे बहुदा खर्चाची बाजू थोडीशी जास्त असेल!(कारण सर्व गोष्टी मनासारख्या नसतात. खरेतर सर्व गोष्टी मनासारख्या कधीच घडत नाहीत.) फक्त खर्चाची बेरीज फार जास्त नाही ना एवढेच पाहावे आणि निराश होऊ नये.
असाच जमाखर्च प्रत्येक खात्याचा मांडावा. आपल्या स्वत:च्या किंवा वडिलार्जित मालमत्तेचाही मांडावा. त्यावरून सर्व भावंडांशी होणारे तंटे, त्यातील काही कायदेशीर बाबी, कटकटी, त्याबाबत होणारा सासुरवाडीकडच्या लोकांचा हस्तक्षेप, त्यावर होणारा खर्च, सदर मिळकतीमधून मिळणारे लाभ इ.याचाही जमाखर्च मांडता येईल.
एखाद्या डॉक्टर-वकील अथवा इतर व्यावसायिकांनी जमाखर्च मांडताना त्या व्यवसायात मिळणारा पैसा, लाभ, त्यातले यशापयश, मिळणारी पत, कीर्ती, विशिष्ट केसेसमध्ये आलेले यशापयश, अशिलांशी व इतर समव्यावसायिकांशी बरोबरचे संबंध याचाही जमाखर्च मांडावा. जमा जास्त की खर्च जास्त ते पाहावे. या रितीने सर्व गोष्टींचा – खात्यांचा वेगवेगळा जमाखर्च मांडावा. या सार्यांचा मिळून आयुष्याचा जमाखर्च मांडावा. प्रत्येक वेळेस जमा जास्त असेल असे काही नाही. कोठे खर्चाची रक्कम जास्त असेल तर कोठे जमेची ! थोडासा फरक कोणत्याही बाजूला असला तरी फार आनंद वा दु:ख वाटून घेऊ नये. एका खात्यात जमा जास्त असेल तर दुस-या कुठल्या तरी खात्यात खर्चाची रक्कम जस्त असू शकेल. संपूर्णत: जमाखर्च कोणाचा कधीच जुळत नाही. फरक सापडला व त्याची जागा किंवा कारण नक्की करता आल्यास उत्तम ! अन्यथा तो फरक सोडून द्यावा. हिशोब लेखनाच्या शास्त्रानुसार तो सापडलेला फरक ’सस्पेन्स’ खात्यात टाकण्याची रीत आहे. आयुष्यातल्या निरनिराळ्या खात्यांमधील असा न सापडलेला फरक ’नशीब’ नावाच्या सस्पेन्स खात्यात टाकावा.
हिशोबातल्या जमाखर्चातील सस्पेन्स खाते आणि तुमच्या आयुष्यातील सस्पेन्स खाते यात फरक आहे. हिशोबातली चूक कधी कधी चटकन सापडते आणि सस्पेन्स खाते बंद करता येते; परंतु नशीब खात्यातील चूक लगेच सापडते असे नाही, सापडल्यास दुरुस्त करण्यास अवधी नसतो अथवा उशीर झालेला असतो. उदा. नोकरी खात्यामध्ये सुरुवातीला सरे सुरळीत चालू असते… नोकरी जवळ असते…पगार चांगला असतो…समाधान मिळत असते….पण अचानक नवीन बॉस येतो आणि आपले त्याच्याशी पटत नाही हे ध्यानात येते. ती नोकरी बदलता येत नाही हे ध्यानात तर येतेच व तोवर नवा बॉस कायम झालेला असतो. साहजिकच होणारा मन:स्ताप ’नशीब’ या खात्यावर टाकावा लागतो ! फ्लॅट घेतला …जागा चांगली स्टेशन / बाजाराच्या ठिकाणाजवळ असते…बिल्डर सर्वार्थाने चांगला लाभतो, परंतु शेजारी भांडकुदळ निघतात ! पुन्हा ’नशीब’ म्हणावे ! बायको चांगल्या समविचारांची , सुसंस्कृत व व्यवस्थित लाभली…परंतु तिचे आईवडील (खासकरून आई!) खाष्ट आपल्या संसारात हस्तक्षेप करणारी निघाली तर? त्यावरून पत्नीशी वाद घालता येत नाही आणि काही करता येत नाही ! पुन्हा ’नशीब’ म्हणावे लागते. म्हणूनच इंग्रजीत एक म्हण आहे ती अनुवाद करून इथे सांगावीशी वाटते…
तुम्ही मित्र निवडू शकता, नातेवाईक नाही!
तुम्ही राहायचे घर निवडू शकता, शेजारी नाही!
तुम्ही नोकरी निवडू शकता, बॉस नाही!
तुम्ही जोडीदार निवडू शकता, पण त्याचे नातेवाईक नाही!
आता मी म्हटल्याप्रमाणे त्या खात्यांवरील सस्पेन्स खात्यामधला (नशीब) फरक असाच राहतो व त्यात बदल करता येत नाही. मूळ चूक सुधारता येत नाही. म्हणजेच हिशोबातील जमाखर्चातील फरक शून्य होईल पण नशीब खात्यातील नाही. हा फरक सोडून द्यावा लागतो. फार रक्कम ’नशीब’ खात्यावर पडलेली नाही ना एवढीच खात्री करून घ्या ! मित्रांनो, आयुष्याचा जमाखर्च कधीतरी गंमत म्हणून मांडायला काय हरकत आहे? पण हल्ली बॅंकेत कर्ज घेताना आगाऊ जमाखर्च / अंदाजपत्रकात देण्याची रीत आहे तसा मात्र आयुष्याचा जमाखर्च मांडता येत नाही !
लेखक: प्रा. जयंत म. करकरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा