’फक्त’ शब्दाची मजा सांगते मी इथे,
जास्त नाही, फक्त काहि, शब्द लिहिते इथे ll १ ll
सांगतो, एकमेका, फक्त आराम कर,
नशिबी असे परी, फक्त तू काम कर ll २ ll
फक्त चहा, फक्त नाश्ता, फक्त स्वयंपाक कर,
फक्त मुलांचा अभ्यास घे, अन फक्त, नोकरी कर ll ३ ll
फक्त स्वच्छता कर, अन फक्त बाजारहाट कर,
फक्त बिले तू भर, अन, फक्त आराम कर ll ४ ll
मुलांना सांगतो आम्ही, फक्त अभ्यास कर,
फक्त स्कॉलरशीप, अन फक्त स्पर्धा कर ll ५ ll
फक्त क्लास, फक्त गाणे, फक्त व्यायाम कर,
फक्त नाच, फक्त प्रत्येक कला, आत्मसात कर ll ६ ll
फक्त शब्दाने किती केली जादू ही अशी,
फक्त शब्दाने लहान वाटती लाखोंच्या राशी ll ७ ll
म्हणून तुम्हीही सदा ’फक्त’ ठेवा लक्षात,
फक्त, फक्त, असे नेहमी घोका मनात. ll ८ ll
कवयित्री: सुलभा मुंडले

३ टिप्पण्या:
वा!
मस्तच! फक्तच महिमा अफाट आहे.
फक्त ! मस्तच आहे.
टिप्पणी पोस्ट करा