" गाजर हलवा! "

साहित्य: २ वाट्या गाजराचा कीस, १/२ ली. दूध  १ वाटी साखर, २ चमचे तूप, वेलची, जायफ़ळ, बदाम, काजू अन चारोळी.
कृती: दूध उकळवून आटवून घ्या. कढईत गाजराचा कीस नुसताच परतून घ्या. चांगले परतून त्यात १ चमचा तूप घाला. व्यवस्थित परतणे आवश्यक आहे. आता यात उकळून आटवलेले दुध घालून परतत रहा. हे सर्व व्यवस्थित शिजत आले की त्यातले पाणी आटत जाईल. आता पुन्हा उरलेले १ चमचा तूप घाला. दाणेदार हलवा तयार झाल्यावर त्यात काजू-बदामाचे काप अन चारोळ्या घालून सजवा.



    प्रेषक: आल्हाद पाटील

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

आल्हादजी हलव्याचा रंग का गेला? तुम्हाला भगवा रंग त्रास देतो का?