हृदय तोड दे !

चित्रपट -  पुरब और पश्चिम
गीत - इंदिवर
संगीत -  कल्याणजी आनंदजी
गायक - मुकेश

कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे...ह्या हिंदी गाण्याचा भावानुवाद!

दाचित कुणी तुज दगा जर दिला
घराबाहेरील जर रस्ता दाविला
तेव्हा तू प्रिये यावे माझेकडे
न संकोचता तू मनाशी जरा, ही
                  विनंती गडे .... ॥धृ०॥

तुला आज माझी गरज ना मुळी
हजारो जीवांचे तुला साकडे
तुझे आज तारुण्य ऐसे जसे
की प्रेमवीरांचा गराडा पडे
हसतील तुला हे जेव्हा आरसे
न भाळेल रुपावर कुणी फ़ारसे
तेव्हा तू प्रिये यावे माझेकडे
जरा ठेव विश्वास मजवर तुला ही
                  विनंती गडे .... ॥१॥

म्हणू प्रेम याला की व्यवहार हा?
करतेस तू जे तुला आवडे
तुडवून पायी तू मम भावना
कसली नशा ही तुला गं चढे
उतरेल जेव्हा तुझी ही नशा
अंधारतील या दहाही दिशा
तेव्हा तू प्रिये यावे माझेकडे
उघडीच असतील अभय ही कवाडे
                  सदाही गडे .... ॥२॥

कवी: गंगाधर मुटे

४ टिप्पण्या:

sanket म्हणाले...

अप्रतिम अनुवाद !

मंदार जोशी म्हणाले...

सहीये! मुटे सर जियो!!

क्रांति म्हणाले...

चांगला अनुवाद.

Meenal Gadre. म्हणाले...

‘ गडे ‘ ऐवजी प्रिये हा शब्द तसाच ठेवला असता तरी चालले असते. ‘ गडे‘ हा लाडिक शब्द स्त्री संभषणात एकला जातो. हे मूळ गाणे स्त्री आवाजात नाही.
अर्थात या अनुवादात चालून जाते आहे.