नवी पहाट - नव्या आशा आकांक्षा!

हे दृश्य टिपलेय ... नाशिक जवळच्या नांदूर-मध्यमेश्वर परिसरातील सूर्योदयाच्या वेळी. गारठून टाकणार्‍या थंडीने पहाटेचे सर्व व्यवहार मंदावले असले तरीही निसर्गाचे चक्र मात्र नेहमीप्रमाणे सुरूच असते. भल्या पहाटे निसर्गाचा आगळा नजारा आपल्याला बघावयास मिळतो. हळूहळू प्रकाश वाढत असतो, आसमंत  तेजाने उजळत असते आणि पूर्वेच्या क्षितिजाकडून हलकेच सूर्याचे दर्शन होते.  सोनेरी किरणांनी सर्व परिसर झळाळून उठतो आणि आणखी एक नवा दिवस सुरू झालेला असतो ..... !!!

छायाचित्रकार: आल्हाद पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: