सद्द्या वातावरणही आल्हाददायक आहे. थंडी गुलाबीच आहे (नेहमी बोचरी असली तरी)! तर अशा वातावरणात मी आणि माझी सौभाग्यवती नित्यनेमाने पहाटे प्रभात फेरी काढत असतो. आजूबाजूला थोडा अंधार असतोच, आकाशातील चांदण्या जरी अस्ताला गेल्या तरी धरणीवर अनेक चांदण्या उगविलेल्या असतात. भारतात तालिबानी कायदा नसला तरी जवळपास, काही म्हातार्या सोडून कित्येक जणी हिंदुस्थानी बुरख्यात, तोंडावर रुमाल बांधूनच असतात. पाहायचे असेल तर डोळेच डोळे भरून पाहावे लागेल. ते नयन बोलले काहीतरी हेही लक्षात येते, पण हाय रे देवा, नुसत्या डोळ्याला डोळा भिडवून आपली वाट चालावी लागते.
आम्ही सकाळी घरातून जरी सोबत निघालो तरी तिच्या आणि माझ्या चालण्याच्या गतीत फार फरक आहे. यातून बरेचदा खटकेही उडतात, नाही तर ती मागून माझा हात जोरात ओढून रागाने फणकारते. मी आपला, उगीच पहाटे रस्त्यावर नवा शिनेमा नको म्हणून चूप बसतो, तिला थोडे भरभर चालण्याचे फायदे पटवून सांगतो, पण हाय रे देवा. तिचे आपले तेच रडगाणे. कधी कधी मी थोडा वेगात असतो, ती मागे पडते. दोघात तिसरी आली तर तिचा मात्र तिळपापड होतो. काल मात्र फिरून आल्यावर जाम चिडली होती. तुम्हाला माझ्या सोबत चालावे लागेल. मी तुमच्या सारखी तरतर चालणार नाही, आणि दोघात तिसरी अजिबात नाही. नाहीतर मी एकटी जायला तयार आहे.
म्हटलं, ठीक आहे. जा एकटी, पण तुला मागे पुढे निदान १० तरी बॉडीगार्ड द्यावे किंवा घ्यावे लागतील. सकाळी कुठलाही दागिना अंगावर घालून फिरता येणार नाही.
तिचं आपले लगेच, १० बॉडीगार्ड कशाला? मी काय पळून चालली, उगीच आपलं काहीही.
म्हटलं, तू पळून नाही जाणार, पण सकाळी फिरणारे सगळेच सभ्य आहेत काय, हवशे, नवशेही फिरायला येतात. तिनं आपले तोंड वाकडे केलेच, पण बरं म्हटले. मी ही मनोमन आभार मानले.
काही दिवस मजेत गेले, तिचं आपलं पुन्हा रडगाणं! तुमचे आपले रस्त्याने चालताना माझ्याकडे लक्षच नसते. सारखे येणारीकडे पाहता, निदान दोन शब्द तरी वोलता काय?
म्हटलं, हे बघ! एक तर त्या बुरख्यातून काही दिसत नाही, आणि मी आपला कोणी ओळखीची असेल या भावनेने बघतो गं तिकडे, माझा उद्देश असा काही नाही. वाटलं तर मी उद्यापासून फिरायला येणे बंद करतो.
तिचं लगेच, अहाहा, चाल्ले आपले शिकवायला, कोणी ओळखीचे असेल. सगळे तुमच्याच ओळखीचे असतात.
हा वाद काही दिवसांनी मिटला. मीही आपले सरळ रेषेत पाहत, अगदी तीच्या सोबत, मग ती अगदी मुंगीच्या चालीत जरी चालत असली तरी तसा चालू लागलो. एक दिवस ती पुन्हा फणकारली, मी काय अशी चालते काय?
म्हटले, तू नाही गं राणी, मीच थकलो, आणि वेळ निभावून नेली.
एक दिवस सौ. लाडात होती. चालता चालता मला म्हणाली, ती समोरून येणारी किती सुंदर आहे. लांबसडक केसं.
मी, व्वा! खरंच सुंदर आहे...म्हणणार, एवढ्यात तिचं तोंड वाकडे झाले. म्हटले हो गं! सुंदर आहे. मी ही रोज नेमाने हेच चुपचाप सहन करत आलो.
ती...मला वाटलंच तरी! बरं, जाऊद्या! मला की नाही तिच्या जोड्यासारखे जोडे आणायचे आहेत. उद्या बाजारात जायचे का? मीही हो म्हटले.
बाकी, फिरायला जाण्याचे सर्वच अनुभव चांगलेच आहेत यात तीळमात्र शंका नाही, या विचारात नेहमी फिरायला जातो तेही बायकोसह.
लेखक: मुक्तेश्वर कुलकर्णी!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा