तोच थंडगार भात !

(चाल: तोच चंद्रमा नभात )

तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी
एकांती मजसमीप तीच भीती का मनी !

खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे
पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे
भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी !सारे जरी ते तसेच संधी आज ती कुठे ?
मीही तोच, तीच तीही, दुसरी मेस ती कुठे ?
ती कपात ना दरात अश्रू दोन लोचनी !


त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा
डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा
नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी !

विडंबनकार: विजयकुमार देशपांडेगायक: विनायक रानडे

५ टिप्पण्या:

शांतीसुधा म्हणाले...

फारच मस्त. हसून हसून पुरेवाट!

शांतीसुधा म्हणाले...

रानडेकाका, गायन एकदम फक्कड.

अमित दत्तात्रय गुहागरकर म्हणाले...

हे हे हे भारीय

विनायक म्हणाले...

तुमच्यात शांती आणि सुधा अशा मला दोन व्यक्ती नेहमी दिसतात, कारण तशाच प्रतिक्रीया व लेख तुमच्या कडून वाचायला मिळतात. तुम्ही दिलेली दाद फार आनंद दिलात, आभारी आहे.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

वा रानडेसाहेब, आपल्याला सूर तालाची समज फारच चांगली आहे. शब्दोच्चार स्पष्ट, ध्वनिमुद्रण अप्रतिम. डग्ग्याचे वजन तसेच टाळाचा मंद नाद देखील सुरेख टिपला आहे.

गाणे ऐकतांना प्रथम याच गोष्टी जाणवल्या. आता शब्दांबद्दल विडंबन उत्कृष्ट जमले आहे. लयताल, वृत्ताची नादमयता, गेयता न बिघडवता विडंबन मस्त जमले आहे.